Published On : Sat, Feb 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बारावीचे पेपर लीक,पोलिस तपास सुरू, दोषींना सोडणार नाही;मंत्री भोयर यांचा इशारा

नागपूर : शहरात बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांचे प्रश्नपत्रिका लीक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी Sadar Police Station येथे गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री Pankaj Bhoyar यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,000 /-
Silver/Kg ₹ 2,70,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून प्रश्नपत्रिका प्रसारित-
मिळालेल्या माहितीनुसार, १५ विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिका शेअर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात दोन विद्यार्थी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांनी खासगी कोचिंग क्लासशी संबंधित एका शिक्षकाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले असून डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. प्रश्नपत्रिका नेमक्या कोणत्या स्रोतामधून बाहेर पडल्या आणि किती जणांपर्यंत पोहोचल्या, याचा शोध घेतला जात आहे.

संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार –
तपासादरम्यान परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा शिक्षण विभागातील कुणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

सतर्क पर्यवेक्षकांमुळे प्रकार उघड-
मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीने वॉशरूमसाठी बाहेर जाऊन १० ते १२ मिनिटे परत न आल्याने पर्यवेक्षकांना संशय आला. तपास केल्यानंतर प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

“समाजात चांगल्या-वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात. मात्र गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. खासगी कोचिंग क्लास, कोणताही व्यक्ती किंवा विभागाशी संबंधित कुणीही दोषी आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही,” असा इशारा भोयर यांनी दिला.

या घटनेमुळे बोर्ड परीक्षांच्या गोपनीयतेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शिक्षण विभागाच्या अंतर्गत चौकशीचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement