Published On : Mon, Apr 2nd, 2018

महा मेट्रो तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


नागपूर: महा मेट्रो आणि एफकॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हडस हायस्कुल येथे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सोमवारी महा मेट्रोच्या सुरक्षा अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. शाळेत वार्षिक परीक्षा सुरु असताना सुद्धा मोठ्या संख्येने प्राथमिक स्कुल’चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षतेवर माहिती दिली.

नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरमहा रस्ते सुरक्षा अभियान राबविले जाते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनपर्यंत रस्त्यावर सुरक्षेसमंधी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे महत्व पटवून देण्यासाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शाळेच्या अगदी समोर मेट्रोचे कार्य सुरु असल्याने त्याचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हि स्पर्धा राबविण्यात आली.


चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर वाहनांची सुरक्षा, महा मेट्रो नागपूर, सार्वजनिक बस, वाहतूक सिग्नल’चे महत्व इत्यादी विषयावर चित्रे रेखाटून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी रिच-३ चे मुख्य प्रकल्प संचालक आर अरुण कुमार, एफकॉन्स’चे मुख्य सुरक्षा तज्ञ श्री. स्वामी नाथन सुब्रमण्यम आणि हडस हायस्कुलचे शिक्षकगण उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement