Published On : Mon, Aug 19th, 2019

वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा

Advertisement

रामटेक :विद्यासागर कला महाविद्यालयात नारळी पौणिमेच्या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परिसरातील 300 वृक्ष आणि रोपट्याना राखी बांधून त्यांच्या जतनाची आणि संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. नारळी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षनाची जबाबदारी देते.

अशाचप्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वतः स्वीकारून पर्यावरणाविषयी असलेली जागरूकता व्यक्त केली. वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन करणे हे आज किती गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या कृतीतून दाखवून दिले.

नेचर क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .पिल्लई यांनी राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात करून दिली.

प्रा. अनिल दाणी यांनी या कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. गिरीश सपाटे, डॉ. सावन धर्मपुरीवर , डॉ. ज्योती कवठे, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. सतीश महल्ले, डॉ. आशिष ठाणेकर, यनूस पठाण यांनी सहकार्य केले. कु. स्नेहल खेडीकर हिने सूत्रसंचालन केले.