Published On : Mon, Jan 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्रजासत्ताक सोहळ्यातील परेडमध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर: २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा शहरातील कस्तुरचंद पार्क येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणाऱ्या परेडमध्ये यंदा नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविण्याचा बहुमान मिळाला.

नागपूर महानगरपालिकेच्या परेडमध्ये संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा व विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी परेडमध्ये सहभागी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे मनपाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित केले.

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, श्री. विनय बगले, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णे, संजयनगर हिंदी माध्यम शाळेच्या श्रीमती दांडेकर, श्रीमती भगत, श्री. डोईफोडे, वैभव कुंभरे उपस्थित होते.

Advertisement