नागपूर : शहरात गुंडाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या गुंडांकडून गुन्हेगारीसह महिला आणि मुलींचा छळ करण्याचे प्रकारही समोर येत आहेत. नुकतेच मैत्रिणीसह महाविद्यालयात जात असलेल्या विद्यार्थिनीशी एका गुंडाने बसमध्ये घुसून अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असता ठार मारण्याची धमकी त्याच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
मुलीने लगेच कुटुंबीयांना माहिती देऊन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. सोनू उर्फ गेंडा राजकुमार दांडेकर (२४) रा. भांडे प्लॉट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी बुधवारी दुपारी महाविद्यालयात जात होती. गेंडाने तिचा रस्ता अडवून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ती मुलगी बसमध्ये बसल्यानंतर तो देखील तिच्या बाजूला जाऊन बसला. तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. नंबर दिला नाहीतर जिवे मारण्याची धमकी असे त्याने त्या मुलीला म्हटले.
यामुळे मुलगी घाबरली आणि तिने वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. गेंडाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून गेंडाला अटक केली. न्यायालयाने त्यांची तुरुंगात रवानगी केली.
सदर पुलिस का देर रात हुक्का बार पर बड़ा छापा #vidarbhanews #nagpur...
Police Raid in Nagpur: अवैध कत्लखाने से 400 किलो गोमांस बरामद #NagpurNews...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JULY 2026 #topnews...
दोस्त का विवाद सुलझाने गया युवक बना हमले का शिकार #NagpurNews #Crime...
Amravati Breaking News: 1,925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जब्त #AmravatiNews #PlasticBan #PlasticFree
20 जुलाई को दिल्ली जाएंगे उद्धव ठाकरे #UddhavThackeray #SonamWangchuk #ShivSenaUBT #Politics #news





