Published On : Wed, Jul 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सुलभ सुविधाजनक आणि सुरक्षित

महाकार्डवरील भाड्यात ३०% सूट
Advertisement

नागपूर : सध्या शहरात उपलब्ध अनेक सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांच्या पसंतीस उतरलेली वाहतूक सेवा म्हणजे नागपूर मेट्रो रेल सेवा. मेट्रो हे वाहतुकीचे सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर आणि सुरक्षित साधन आहे. नोकरीपेशा लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त ठरत आहे. महा मेट्रोने आजपर्यंत प्रवाश्यांच्या दृष्टीने अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात विशेषत्वाने विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकएंड सवलत, दैनिक पस फक्त १००रुपयात आणि महाकार्डने प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या ३०% सवलतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मेट्रो प्रवास जास्त लोकप्रिय झाला आहे. ह्याचीच दखल घेत महा मेट्रो नागपूरने २०० रुपयांच्या टॉपअप करून महाकार्ड मोफत देण्याची ऑफर आता १४ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.

२०२३ – २०२४ या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्याने मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थी आणि पालकांना सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. सोबत सायकल नेता येण्याच्या परवानगीशिवाय इ-सायकल, इ-रिक्षा, फिडर बस सेवेची व्यवस्था मेट्रो स्थानकांवर केली गेली आहे. मेट्रो स्थानकावर पार्किंग सेवा देखील उपलब्ध आहे. डिजिटल पेमेन्टचे प्रमाण वाढावे यासाठी व कॅशलेस व्यवहारांसाठी महाकार्ड हा एक उत्तम मार्ग आहे. प्रवाश्यांनी जास्तीत जास्त महाकार्डचा उपयोग करावा यासाठी २०० रुपये टॉपप भरून महाकार्ड फ्री देण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. महाकार्ड घेण्यासाठी आधार कार्ड आणि शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र दाखवून कोणत्याही स्थानकावर संपर्क साधता येतो. ऑरेंज आणि एक्वा लाईनवर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असते.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

•१४ ऑगस्ट शेवटची तारीख
महाकार्डवर मेट्रो प्रवासा दरम्यान तिकिटांवर 10 टक्के सूट दिली जाते. हे कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सहकार्याने चालवले जात आहे. यापूर्वी महाकार्ड १५० रुपयांना विकत घ्यावे लागत होते परंतु १४ ऑगस्ट पर्यंत आता महा कार्ड विकत न घेता २०० रुपयांच्या टॉपपवर मिळवता येईल. हे २०० रुपये प्रवाश्यांना प्रवासासाठी वापरता येतील.

प्रवाशांच्या सोयीसाठी, महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित AFC प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीद्वारे, प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर त्यांचे कार्ड टॅप करावे लागते आणि त्याद्वारे प्रवाशांचे भाडे कार्डमधून कापले जाते.

•शनिवार व रविवार सवलत 30%
महा मेट्रो प्रत्येक शनिवार आणि रविवार आणि राजपत्रित सुट्टीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांसाठी भाड्यात 30% सवलत देत आहे. सर्व वर्गांसाठी शनिवार व रविवार सवलतीच्या लाभामुळे, लोक मेट्रोमध्ये कुटुंबासह प्रवास करतात आणि शहराच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेतात.

•दैनिक पास
व्यापाऱ्यांसाठी सोयीचे जावे म्हणून महा मेट्रो नागपूरने फक्त १०० रुपयात दैनिक पास उपलब्ध करून दिली आहे. हि दैनिक पास एका दिवसासाठी वैध राहील, यावर एका दिवसात एका प्रवाश्याला कोणत्याही स्थानकावरून, कितीही वेळा प्रवास करता येतो.

Advertisement
Advertisement