Published On : Sun, Dec 1st, 2019

भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन, समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.

‘लिडरशीप, पोलिटिक्स गव्हर्नन्स’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या अभ्यासक्रमाचे संचालक देवेंद्र पै तसेच विविध राज्यातील विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement