नागपूर : शहरात मानव तस्करी आणि बाल देह व्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी या संदर्भात विशेष SOP (मानक कार्यप्रणाली) जारी केली असून नागरिकांसह गृहनिर्माण संस्था, घरमालक, ब्रोकर आणि प्रॉपर्टी मॅनेजर्सना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या SOP नुसार भाडेकरूंची काटेकोर पडताळणी करणे, परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्तांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मानव तस्करी किंवा बाल देह व्यापाराशी संबंधित कोणतीही अवैध कारवाई आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे, तर अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता सील करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून “तुमची जागरूकता अनेक निष्पाप जीव वाचवू शकते” असे सांगत सुरक्षित शहर निर्मितीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





