Published On : Tue, Aug 27th, 2019

प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाजातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडून पक्षसंघटन अधिक बळकट करावे-आमदार बच्चू कडू

भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्याचा प्रहार संघटनेत प्रवेश

कामठी :- प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाजातील शेतकरी शेतमजूर व शेवटच्या नागरिकांच्या विविध समस्या सोडवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांनी प्रहारच्या वतीने वडोदा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केली

कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांचे हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेता देवेंद्र गोडबोले प्रवीण उबाळे ,रमेश कारेमोरे, नगरसेवक मंगेश देशमुख, विजय ठाकरे, छत्रपाल करदभाजने, उपस्थित होते मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की गेल्या दशकापासून आपण राज्यातील काँग्रेस भाजप सरकारच्या विरोधात भांडून समाजातील शेतकरी शेतमजूर व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण झटत असून कामठी विधानसभा क्षेत्रातल्या ही शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी व नाग नदी व पोरा नदीचे पाणी नागपूरला पळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकार विरोधात आपण कृती समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले ,कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांना नागरिकांच्या विविध समस्या सोडवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले ,कार्यक्रमात देवेंद्र गोडबोले मार्गदर्शन करताना म्हणाले आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात शेतकरी, शेतमजूर,सामान्य कार्यकर्त्यांच्या विविध समस्येसाठी दिवस-रात्र झटून न्याय मिळवून देत अपंगाच्या विविध समस्या साठी दिल्लीत आंदोलन करून न्याय मिळवू दिला आहे आमदार कडू यांच्या मार्गदर्शनातून आपण कामठी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमादरम्यान कामठी तालुका भाजप युवा मोर्चाचे विनोद इखार, सोनू ठाकरे ,निकेश आखरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहार सामाजिक संघटनेत प्रवेश केला असून त्यांचा आमदार बच्चू कडू यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामठी तालुका प्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष छत्रपाल करडभाजणे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन दिनेश निंबाळकर यांनी केले व आभार प्रदर्शन चेतन गोडबोले यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी