
नागपूर -शहरात वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत वाहन चोरी विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम 303(2) भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करत पोलिसांनी एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे.
या प्रकरणात मृगाग उर्फ मृणाल प्रकाश सोरदे (वय ३६, रा. वैशाली नगर, नागपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून आशिष ईश्वर कांबळे (वय ३६, रा. वडनेर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान मारुती सुझुकी ब्रेजा (MH 32 AR 4465) अंदाजे पाच लाख रुपये किंमतीची तसेच ऍक्टिवा (MH 49 BU 1492) अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये आहे.
आरोपीकडून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करून वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी वाठोडा पोलिस ठाण्यात सुपूर्त करण्यात आली आहेत. वाहन चोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरांविरोधात कडक संदेश गेला आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.








