Published On : Sat, Sep 12th, 2020

एसटीतील महिला लिपीकास मारहाण

Advertisement

– हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर– परिवहन महामंडळावर आधीच आर्थिक संकट. पगाराचे वांदे, दोन दोन महिणे पगार नाही. त्यातही पगाराच्या पावतीसाठी पतीचा तगादा. पगाराची पावती दाखविली नाही या कारणावरून संतापलेल्या पतीने कुठलेतरी द्रव पत्नीच्या अंगावर टाकले. आपला जीव मुठीत घेवून ती घराबाहेर पडाली. शेजाèयांनी अंगावर बादलीभर पाणी घातले. तशाच स्थितीत तीने हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी पती विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

दत्तनगरी पिपळा रोड निवासी २९ वर्षीय आरती २०१४ पासून परिवहन महामंडळात अनुकंपातत्वावर नोकरीला लागली. त्यांना आई आणि एक भाउ आहे. नुकतेच म्हणजे दिड वर्षांपूर्वी आरतीचे काटोलच्या युवकाशी लग्न झाले. तोही खाजगी बँकेत नोकरी करतो. पोलिस तक्रारीनुसार लग्नाच्या २० दिवसांनंतरच पती त्रास द्यायला लागला. सततचा त्रास वाढत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी सासरच्या मंडळींना त्याची माहिती दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर ग्रामीण पोलिस अधीक्षकांसमोर संपूर्ण प्रकरण सांगितले. त्यानंतर एकच दिवस चांगला गेला, पुन्हा जैसे थे स्थिती.

अलिकडेच म्हणजे १ सप्टेंबरला पतीने पगाराची पावती मागितली. यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरतीने डेपो व्यवस्थापकासह हुडकेश्वर ठाणे गाठले. आरती माहेरी असताना पतीने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे आता राग शांत झाला असा समज करून आरती दुसèया दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला औषधाची फाईल घेण्याकरीता घरी आली असता. त्याच्यात पुन्हा भांडण झाले.

पतीने कुठलेतरी द्रव पदार्थ तिच्या अंगावर फेकले. ती घराबाहेर पळाली. लोकांनी मदत केली. बादलीभर अंगावर पाणी घतले. आरतीने १०० या क्रमांकावर फोन करून माहिती दिली. तसेच पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता सपोनि सी.यु. पाटील यांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.