Published On : Mon, Mar 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात होळीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त, १०० ठिकाणी नाकाबंदी

स्टंटबाजीवर होणार कारवाई
Advertisement

नागपूर : रंगांच्या जल्लोषात कायद्याची कडक नजर असणार आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर २ ते ३ मार्चदरम्यान शहरात वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त सज्ज करण्यात आला आहे. तब्बल १०० ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात येणार असून रोडवरील स्टंटबाजी आणि हुडदंगावर थेट कारवाई केली जाणार आहे.

“सण साजरा करा, पण नियम पाळूनच,” असा स्पष्ट इशारा लोहित मतानी (उपायुक्त, वाहतूक) यांनी दिला आहे. आज आणि उद्या रात्री शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग तसेच महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष पथके तैनात राहणार आहेत.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनाचीही प्रक्रिया राबविली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट, चारचाकीचालकांनी सीटबेल्टचा वापर अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

होळीच्या निमित्ताने काही ठिकाणी तरुणांकडून रोडवर स्टँडबाजी, मोठ्या आवाजात डीजे, वेगमर्यादा ओलांडणे किंवा धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार घडतात. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी यंदा अधिक कडक भूमिका घेतली आहे.

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सुरक्षित आणि शांततेत सण साजरा करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत विषय, छात्र परेशान.. #nagpurnews #rtmnu

RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...

संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate

संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news #latestnews #todaynews #today #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...

अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...

टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges