
नागपूर : कामठी परिसरातील ड्रॅगन पॅलेस मंदिर समोर रविवारी रात्री १७ वर्षीय मुलाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यू कामठी पोलिसांनी कायद्याच्या संघर्षातील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मृत मुलाचे नाव अरमान अली (वय १७) असे असून तो कामठी कॅन्टोन्मेंट परिसरातील कमसरी बाजार येथील रहिवासी होता. रविवारी (१ मार्च २०२६) रात्री साडेनऊच्या सुमारास त्याला एका ओळखीच्या व्यक्तीने बोलावून घेतले होते. चर्चेच्या बहाण्याने त्याला हल्दीराम रेस्टॉरंट जवळ, ड्रॅगन पॅलेस मंदिरासमोर येण्यास सांगण्यात आले होते. अरमान आपल्या मित्र मोहित दीपक दहत (वय १७) याच्यासह त्या ठिकाणी गेला होता.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित ओळखीच्या व्यक्तीने इतर काही अल्पवयीन साथीदारांसह अरमानच्या हत्येचा कट रचला होता. घटनास्थळी आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत अरमानवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात अरमानचा जागीच मृत्यू झाला, तर मोहित गंभीर जखमी झाला.
जखमी मोहितला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला मेयो हॉस्पीटल येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी अरमानचे वडील शौकत अब्बास अली (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यू कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून व गुन्हेगारी कटाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
कामठी परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...
पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...
बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया...
पाचपावली में नाबालिग समेत महिला से छेड़छाड़ की दो घटनाएं #NagpurNews #crime...
सौतेली माँ का सौतेले बेटे को 'हवस' का शिकार बनाने का आरोप...
राम मंदिर चंदे पर कांग्रेस ने उठाए सवाल #RamMandir #Ayodhya #Congress #politicalnews...




