Published On : Thu, Jul 16th, 2020

वाडीतील नागरी समस्या कडे राष्ट्रवादी काॅग्रेस ने वेधले लक्ष!

Advertisement

न.प.प्रशासकांना निवेदन देऊन चर्चा!

वाडी : वाडी नगरपरिषद क्षेत्रात नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या समस्या कडे वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले.त्यांनी वाडी नप च्या प्रशासक व उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व तहसीलदार मोहन टिकले यांना निवेदन प्रस्तुत केले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या निवेदना नुसार वाडीतील नाल्याची सफाई करण्यात यावी,पावसामुळे निकृष्ट दर्जाचे बनलेले रस्ते उखडले व खड्डे पडल्याने ते दुरुस्त करावे,डॉ.आंबेडकर नगर-जवाहरलाल नेहरू कॉलेज जवळील कचरा घर हटविण्यात यावे,विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक दाखले देण्याची त्वरित सुविधा करावी,कोरोना प्रसार थांबविण्यासाठी उपाय योजना व डेंगू रोकथामसाठी फवारणी करावी,लोकसेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा,राधनकार्ड लिंक नसणार्यांना ही धान्य द्यावे,मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,बंद पथदिवे सुरू करावे ,

मुख्य रस्त्याचे सिमेंट रस्ते बांधावे इ.मागण्या प्रस्तुत केल्या.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडी शहर अध्यक्ष आशिष ईखनकर,माजी नगरसेवक राजेश जैस्वाल,श्याम मंडपे,सह पदाधिकारी अशोक माने,योगेश चरडे,कृष्णराव चरडे,नरेंद्र राऊत ,दत्ता वानखडे,दिलीप दोरखंडे,दिनेश उईके,राजू खोब्रागडे इ.चा समावेश होता.

Advertisement
Advertisement
Advertisement