Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Nov 11th, 2017

  PCPNDT कायदयाचे उलंघन करण्या-या सोनोग्राफी सेंटरवर कडक कार्यवाही होणार…


  नागपूर:
  नागपूर शहरात ५६४ सोनोग्राफी सेंटर रजिस्टर्ड आहेत त्यापैकी १९९ सेंटर विविध कारणांनी बंद आहेत. चालू असलेले व बंद असलेले सर्व सोनोग्राफी सेंटरची त्रैमासीक तपासणी म.न.पा.चे ५० वैद्यकीय अधीकारी दर तीन महीन्यांनी तपासणी करीत असतात. या PCPNDT कायद्या अंतर्गत उलंघन केलेल्या सात (७) डॉक्टरांच्या केसेस जिल्हा न्यायालयात प्रविष्ठ आहेत, त्यामूळे सर्व सोनोग्राफी सेंटरच्या संचालकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी PCPNDT कायद्यांची अंमलबजावणी करावी आणी लींग निदान करु नये, पी.सी.पी.एन.डी.टी जिल्हा सल्लागार समितची सभा म.न.पा. डीक दवाखाना व्ही.आय.पी. रोड धरमपेठ येथील कार्यालयात संपन्न झाली.

  या बैठकीत समितीचे सदस्य म.न.पा. आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल ‍चिव्हाणे, नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समिती सदस्य व आय.एम.ए. च्या प्रतिनिधी व गायनिक सोसायटीच्या सचिव डॉ. वर्षा ढवळे, प्रसिध्दी स्त्रीरोगतज्ञ व गायनिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. चैतन्य शेंभेकर, प्रसिध्द जनेटीसीष्ट डॉ. विनय टुले, समितीचे सदस्य व मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कायदयाचे सल्लागार ॲड. सुरेखा बोरकुटे, एन.जी.ओ.च्या प्रतिनिधी श्रीमती विणा खानोरकर व कल्पना वानखेडे आदी उपस्थित होते.

  सर्व सोनोग्राफी सेंटर चालविणा-या डॉक्टरांनी PCPNDT कायद्यांची अंमलबजावणी करावे अन्यथा त्यांचेवर कडक कार्यवाही करण्यात येईल. दर महिन्यात १ तारखे पावेतो रिपोर्ट सादर करावे व ऑनलाईन ‍F फार्म न चूकता नियमीत भरावे. इंटरनेटची तक्रार असल्यास त्वरीत दुरुस्त करुन ५ दीवसाच्या आत F फार्म भरावा, सोनोग्राफी मशीन PCPNDT समीतीच्या कुठल्याही परवानगी ‍शीवाय हलवू नये असे,निदर्शनास आले की, काही ठिकाणी परवानगी न घेता सोनोग्राफी मशीन स्वत:च्या मनाने इतरत्र हलवून घेतात त्याची माहिती PCPNDT विभागाला कळत नाही. बरेचदा असे कारण सांगण्यात येते की, मशीन नादुरुस्त असल्यामुळे ती कंपनीला दुरुस्तीला पाठवीली आहे असे करतांनासुध्दा विभागाची अनूमती घेणे आवश्यक आहे. काही सोनोग्राफी सेंटर परवानगी न घेता इतर ठीकाणी हलविली आहे त्यांचे वर PCPNDT कायद्यानूसार कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.

  सोनोग्राफी सेंटरची आकस्मीक तपासणी करतांना रजिस्टर असलेली मशीन नियोजीत ठीकाणी आढळली नाही तर त्याचे बरेचशे अर्थ निघतात जसे ती मशीन कुठे अवैद्यरीत्या लींग निदान करण्यासाठी गेली असेल त्यामूळे सर्व संबंधीत सोनोग्राफी सेंटर प्रमुखांनी सतर्क राहूण पूर्व परवानगी शीवाय मशीन इतरत्र कुठल्याही कारणानी पूर्व परवानगी शीवाय हलवू नये अन्यथा त्यांचेवर PCPNDT कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार येईल.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145