Published On : Fri, Jan 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी उत्पन्न वाढीचे स्त्रोतही बळकट करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मेट्रो कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा

नागपूर : येथील पायाभूत सुविधा व विकास कामांना असलेली गती समाधानकारक आहे. अनेक विकासकामे अजून सुरु आहेत. महानगराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन भविष्यातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन नियोजनावर भर दिला पाहिजे. विकासकामांना जी काही गती मिळते ती विविध विभागाच्या परस्पर सहकार्यावर अवलंबून असते हे सूत्र सर्व विभागप्रमुखांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रकल्प उभारतांना लागणारे भांडवल व त्याच्यातील आर्थिक संतुलन साध्य होण्याकरिता महसुली उत्पन्न कसे वाढेल यावर अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी केले.

मेट्रो भवनला त्यांनी भेट देवून महामेट्रो, नागपूर विकास प्राधिकरण, महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नासुप्र सभापती श्री. संजय मीणा, महा मेट्रो संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री अनिल कोकाटे, संचालक (वित्त) श्री. हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) श्री. राजीव त्यागी उपस्थित होते.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एक ट्रीलियनची आर्थिक व्यवस्था आपल्याला साकारायची आहे. यासाठी नागपूर विकास प्राधिकरण, मनपा, महामेट्रो व इतर प्राधिकरणांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे आले पाहिजे. आपण ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प साकारले आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी तेथील प्रसिद्ध झालेल्या उद्योग व्यवसायांना प्राधान्याने सामावून घेतले पाहिजे. यातून प्रत्येक ठिकाणी व्यवसायाची एक सक्षम साखळी निर्माण होईल. महामेट्रोला प्रत्येक स्टेशनवर यादृष्टीने मोठी संधी असून एक विकासाचा मार्ग यातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यकत्‍ केला. मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यवसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कश्या प्रकारे पुढे आणता येईल व प्रेरित करता येईल या करता उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विकास कामांच्या विस्तारासमवेत आपल्या आर्थिक क्षमताही विस्तारल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण प्रत्येक प्रकल्पातील व्यावसायिक क्षमता वाढविणार नाही तोपर्यंत विकासाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले स्त्रोत हे आपण बळकट केली पाहिजे. यासाठी प्रत्येक विभागाने, कार्यालयाने आपली टीम बळकट केली पाहिजे. आपल्या विभागातील प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे ही भावना मानव संसाधनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीमती सौनिक यांनी मेट्रोभवन येथील एक्सपरियन्स सेंटर, सिटी सेंटर मॉडेल, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (ओसीसी) याची माहिती घेतली. मेट्रो ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत देखील त्यांना माहिती प्रदान करण्यात आली. मेट्रो ऑपरेशन्सच्या डॉट नेट, 6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणी दरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.

आढावा बैठकीदरम्यान श्रीमती सौनिक मंत्रालय स्तरावरुन आवश्यक सर्व सहकार्य असलेले सहकार्य करु, असे सांगितले. फर्स्ट अँड लास्ट माईल कनेटिव्हिटी अंतर्गत नागपूर महानगरपालिका सोबत योग्यरित्या नियोजन करून मल्टीमॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर, पुणे शहरामध्ये उपलब्ध आहे हे अभिमानाची बाब आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Advertisement