Published On : Tue, Jul 9th, 2019

कामठी परिसरातील खाजगी शाळेतील पालकाची लूट थांबवा-कपिल गायधने

Advertisement

भारतीय जनता युवा मोर्चाचे पालकमंत्री बावनकुळे यांना सामूहिक निवेदन सादर

कामठी : -, कामठी परिसरातील सी बी एस सी व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत मोठ्या प्रमाणात पालकांची लूट होत असल्याच्या तक्रारी संदर्भात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन त्वरित पालकाची लूट थांबवून कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे कामठी तालुकाध्यक्ष कपिल गायधने यांनी केली आहे.

भाजप युवा मोर्चाचे कामठी तालुका अध्यक्ष यांच्या कपिल गायधने यांच्या नेतृत्वात पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,कामठी परिसरात अनेक सीबीएससी व इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणातअसून खाजगी शाळेत त्यात आगामी सत्राला सुरुवात झाली असून शाळेच्या वतीने पालकांना नर्सरी, केजी ,प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांन करिता शाळेतूनच गणवेश ,शूज ,वह्यांनोटबूक, दप्तर विकत घेण्याची सक्ती करण्यात आली आहे

त्यामुळे पालकांना मोठ्या प्रकरणात आर्थिक फटका बसत आहेत शाळेतूनच साहित्य खरेदी करण्याच्या शक्तीमुळे मोठ्या प्रमाणात मासिक फिस सुद्धा वसूल करण्यात येत आहे त्यामुळे पालकाला फार मोठा आर्थिक बोजा पडत आहे सोबतच कामठी परिसरात मध्यम वर्ग ,शेतकरी ,शेतमजूर ,सामान्य नागरिक राहत आहे त्यामुळे शाळेच्या आवढव्य खर्च पालकांना न पटण्यासारखा झाला आहे तरी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होणारी पालकाची लूट पालकमंत्र्यांनी दखल घेऊन त्वरित थांबवण्याची मागणी निवेदनात केली आहे खाजगी शाळेतील अवाढव्य खर्च लूट त्वरित न थाबवाल्यास पालकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा पालकांनी दिला आहे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देतेवेळी कामठी तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कपिल गायधने माजी तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अरुण पोटभरे, मोहन माकडे ,स्वप्नील फुकटे, जयेश रघेताटे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी