Published On : Tue, Jul 9th, 2019

राज्यातले पहिले आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतिगृह

मुंबई : मराठा आरक्षणाच्या निमित्तानं राज्यात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ,आर्थिक मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता .त्याअन्तंर्गत पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजने अंतर्गत मुबईत पहिलं पंजाबराव देशमुख बॅाईज होस्टेल मुंबईत सुरू होत आहे.

मुंबईत शैक्षणिक सुविधा उपलब्ध असूनही राहण्याची व्यवस्था नसल्यानं अनेक होतकरू विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत .त्यामुळे मुंबईत या विद्यार्थ्यांसाठी 72 खोल्यांचं वसतिगृह सुरू करण्यात येत आहे . त्याची कायदेशीर पूर्तता झाली असून या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडे सोपवण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे एडवोकेट आप्पासाहेब देसाई म्हणाले की , मुंबईतील वडाळा स्टेशन जवळ 71खोल्यांचं हे वसतिगृह सूरू करण्यात येणार आहे.या वसतिगृहाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून वसतिगृहाच्या रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आहे.या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल .महिन्याला 1 हजार रूपये एवढी कमी फी आकारून विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे ,त्यांनाी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडे संपर्क साधाावा ,असं आवाहनही एडवोकेट देसाई यांनी केलं आहे.

या वसतिगृहात सुमारे 213 विद्र्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. एण्टापहिल येथील वडाळा अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर हे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.हे वसतिगृह अत्याधुनिक सोयींनी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येथे भोजनालयाचीही वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे . या वसतिगृहामुळे अनेक गरिब विद्यार्थ्यांची सोय होणार आहे .

संपर्क-9769735825