नागपूर : शेअर बाजारात आज मंगळवारी तेजी पाहायला मिळाली.बाजार उघडताच सेन्सेक्सने उच्चांक गाठला असून यात ३३४.०३ अंकाची वाढ पाहायला मिळाली. एकंदरीत पाहाता सेन्सेक्स निर्देशांकाने ७७,२३५.३१ टप्पा गाठला. तर निफ्टीमध्ये १०८.२५ अंकाची वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे निफ्टी निर्देशांक पहिल्यांदाच २३,५७३ वर पोहोचला.
‘या’ कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी-
सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.
तर मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअर घसरल्याचे पाहायला मिळाले. तसेच फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर लाल रंगात दिसत होते. ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यामध्येही ०.५ ट्कक्यांची वाढ दिसून आली. ओएनजीसी शेअरने १.२ टक्क्यांची वाढ झाली.