Published On : Tue, Sep 29th, 2020

सकारात्मक राहा, समाजात सकारात्मकता पोहोचवा

Advertisement

कोव्हिड संवादमध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांचा संदेश

नागपूर : आज कोव्हिड प्रमाणेच हृदयविकार आणि अर्धांगवायूचे सुद्धा रुग्ण वाढत आहेत. सुरूवातीला कोव्हिड हा फुफ्फुसाचा आजार समजले जायचे, आज मात्र त्यातील संशोधनाने तो रक्तवाहिन्यांमधील आजार असल्याचे निष्पन्न झाले. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने त्याचा प्रभाव फुफ्फुसासह, हृदय आणि मेंदुवरही पडतो. त्यामुळेच हृदयविकार आणि अर्धांगवायूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संदर्भात समाजात हवी तशी जनजागृती आजही झालेली दिसून येत नाही. एखादी शहराबाहेरील व्यक्ती रुग्णालयात काम करते म्हणून घरमालक त्याला घरी येउ देत नाही तर दुसरीकडे कोरोना होईल म्हणून काही लोकांनी स्वत:लाच अनेक महिन्यांपासून घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार पुढे येत आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही गंभीर बाब आहे. कोरोना होतो म्हणून आपण रोजचे व्यायाम बंद केले आहेत, सकाळी फिरणे बंद केले आहेत, त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर पडतो. आज सुरक्षेसह सकारात्मक विचारांची जास्त गरज आहे. आपले नित्याचे काम करताना सुरक्षा घेणे अत्यावश्यक आहेच शिवाय आपण सकारात्मक विचार करणे आणि ते विचार इतरांपर्यंत पोहोचविणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे कोव्हिडच्या या लढ्यात जिंकायचे असेल तर नेहमी सकारात्मक राहा, समाजात सकारात्मकता पोहोचवा, असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने डॉ. प्रशांत जगताप (विवेका हॉस्पिटल) यांनी ‘कोव्हिड आणि हृदय’ या विषयावर मंगळवारी (ता.२९) मार्गदर्शन केले व नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, कोव्हिडचा हृदयावर परिणाम होउ शकतो हे आपल्याकडे आता सिद्ध झाले आहे. मात्र पाश्चिमात्य देशांनी कोव्हिडचा हृदयाच्या पेशींवर परिणाम होत असल्याचे आधीच सांगितले होते. कोव्हिड रुग्णामध्ये जास्त जोखमीचे लक्षणे असताना त्याच्या प्रतिकारशक्तीचा प्रभाव हृदयावर होतो. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत कुठल्याही व्यक्तीला ॲसिडिटी, छातीत दुखणे असा त्रास होत असल्यास काळजी न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जा. जेवढ्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचाल तेवढा धोका कमी आहे. आज अनेक लोक हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरतात. मात्र हॉस्पिटलमध्ये कोव्हिडचा धोका नाही, तिथे सर्व प्रकारची काळजी घेउनच उपचार केले जाते, असेही त्यांनी सांगितले.

स्वत:साठी, हृदयासाठी वेळ द्या
आज कोरोनाच्या भीतीने आपण आपली नित्य दिनचर्या पूर्णच बंद केली आहे. मुख्य म्हणजे सकाळी फिरणे, व्यायाम बंद केले असल्याचे दिसून येत आहे. व्यायामाने आपल्या हृदय आणि मेंदूला सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे नियमांचे पालन करताना व्यायाम आणि फिरणे याकडे दुर्लक्ष करू नका. रोज किमान २५ मिनिटे चाला. याशिवाय रोज ७ ते ९ तास शांत झोप घ्या, रोज संतुलीत आहार घ्या, आहार फळे, भाज्या, ८ ते १० ग्लास पाणी प्या, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी, फळांचा रस, सूप प्या. कोणत्याही गोष्टींचा ताण घेउ नका. आधी महत्वाची कामे पूर्ण करा, मित्रांशी, आप्तगणांशी बोलत राहा. या सर्व गोष्टी आपल्या स्वत:साठी आहेत, स्वत: सकारात्मक राहा, त्यामुळे आपले हृदय निरोगी राहिल. आपल्या नित्यक्रमातून स्वत:साठी आणि आपल्या हृदयासाठी वेळ काढा, असा विशेष संदेश डॉ. प्रशांत जगताप यांनी जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने दिला.

Advertisement
Advertisement