| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Aug 24th, 2020

  आप तर्फे ताजिया प्रथा सुरु ठेवण्या करिता पोलिस आयुक्ताना निवेदन

  नागपुर – आम आदमी पार्टी नागपूर द्वारे १५० वर्षापासून करबला (इमामवाडा) येथे ताजिया थंडा करण्याकरिता उत्सव साजरा करण्यात येत आहे पण कोरोना विषाणू पसरण्याची भीती असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे असताना हि आपली परंपरा कायम राहावी म्हणून दोन लोकांना परवानगी देण्यात यावी असे निवेदन आप पार्टी कडून संयुक्त पोलीस आयुक्त श्री. निलेश भरणे यांना देण्यात आले.

  हि प्रथा नागपुरात शुरू करणारे श्री विकास कुंभारे (जुनी मंगळवारी ), अब्दुल करीम (शांतीनगर), अकबर उस्ताद, अजीज खान (लष्कारीबाग) इत्यादी परिवार द्वारे कमीत कमी ४०० लोक ताजिया घेवून करबला पर्यंत येत होते. तरी कोरोना काळात नियमाचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता पोलीस परवानगी घेण्यासाठी निवेदन देण्यात आले.

  संयुक्त पोलीस आयुक्त श्री. निलेश भरणे यांनी नियमाचे पालन करून फक्त दोन लोक ताजिया थंडा करण्याकरिता करबला (इमामवाडा) जाण्यास पोलिसाची परवानगी आवश्यक नाही असे सांगितले.

  यावेळी आम आदमी पार्टीचे नागपूर शहर सचिव श्री भूषण ढाकुलकर, नागपुर सगंठन मंत्री शंकर इंगोले, विधर्भ युवा प्रमुख पीयूष आकरे, पश्चिम नागपुर प्रमुख आकाश कावले, नागपुर युवा प्रमुख गिरीश तितरमारे, पश्चिम नागपुर संघटन मंत्री हरीश गुरबानी, रोशन डोंगर, इरफान शेख प्रामुख्याने उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145