Published On : Tue, Jun 29th, 2021

ओबोसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निषेधार्थ तहसीलदार ला निवेदन

कामठी :-महाराष्ट्रात ओबीसी वर्गातील लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 27 टक्के आरक्षण आहे मात्र काही कारणास्तव सर्वोचच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले.

सरकारने ओबीसी जनगणनेसाठी तात्काळ कायदेशीर आयोग नेमून जनगणना करावी व त्या आधारे मतदाननिहाय आरक्षण जाहीर करावे व लवकरात लवकर ओबीसींना राजकीय क्षेत्रात आरक्षण द्यावे अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वतीने करण्यात आली असून मागणी पूर्ण न झाल्यास ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बरीएम च्या वतींने तहसिलदार ला दिलेल्या सामूहिक निवेदनातून देण्यात आला.

Advertisement

हे निवेदन बरीएम चे विदर्भ महासचिव अजय कदम यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून याप्रसंगी बरीएम चे कामठी शहर अध्यक्ष दीपंकर गणवीर , उदास बनसोड,सुभाष सोमकुवर, नगरसेविका स्नेहलता ताई गजभिए ,दीपक सरिया ,चंद्रशेखर लांजेवार,नगरसेवक शिवपाल यादव , निखिलेश डोंगरे, राकेश बागड़कर ,अनिल कुरेशी, सुमित फटिंग, विकास टैंभूर्ण, अरविंद बाबोडे आदी उपस्थित होते

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement