Published On : Tue, Sep 22nd, 2020

आम आदमी पार्टी कळून मनपा आरोग्य व्यवस्था सुधारण्या बाबत मनपा आयुक्ताना निवेदन.

Advertisement

RSS_हेडक्वार्टरला जंबो हॉस्पिटल बनवा ही प्रमुखमागणी

नागपुर– आज नागपूर शहरात कोविड -१९ ची फार भयानक परिस्थिती निर्माण झाली असूनही प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होतांना दिसत नाही या महामारीने नागपूरचा पेशंटचा आकडा 50 हजाराच्या वर गेलेला आहे. तसेच दुसऱ्या आजाराने जसे हृदयविकार व ब्रेन हम्मरगे सारखे पेशंट उपचाराअभावी मृत होत आहेत.

गेली अनेक वर्षे पासून मनपा चे 2 दवाखाने सुरू होते व बाकी भंगार अवस्थेत पडले होते, परंतु मागील 6 महिन्यात 6 दवाख्यण्यात सुधारणा केली गेली. त्या दवाखान्यात डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी ची कमतरता असल्यामुळे वैद्यकीय सेवेचे कंबरडे मोडले आहे. कारण काय तर कित्येक वर्ष्यापासून नियुक्तीच करण्यात आली नाही. दुसरीकडे खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भारी पैसे मोजावे लागत असल्याचे वृत्तपत्रात रोजच वाचायला मिळते. सरकारकडून ऑडीटर नियुक्त करूनही सरकारी नियमानुसार Annexure C मध्ये दिलेल्या दरानुसार चार्जेस घेणे बंधनकारक असतांनाही खाजगी हॉस्पिटल मनमानी वसुली करीत आहे, यावरनियंत्रण येणे गरजेचे आहे..

मनपा द्वारे बनविलेल्या कॉल सेंटरवरून फक्त खाजगी हॉस्पिटलच्या बेड माहिती दिल्या जाते. मनपा किंवा सरकारी रुग्णालयांची बेड ची माहिती कमी प्रमाणात दिल्या जाते,यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडून बेडची उपलब्धता कुठे व किती याची माहिती घेणे व जनतेला देणे अपेक्षित आहे.

सर्वच स्मशान भूमीवर मोफत दहन विधी (अग्नी देण्याचे कार्य) होत असत परंतु काही महिन्यांपासून यावरही शुल्क आकारण्यात येत आहे. कोविड मुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर डीझेल दहन वाहिनी मध्ये मोफत अंत्यविधी करण्याची सोय करावी याकरिता आम आदमी पार्टी तर्फे मा.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

वरील सगळ्या मागण्या मान्य व्हाव्या याकरिता आम आदमी पार्टी नागपूरचे विधर्भ संयोजक देवेंद्र वानखड़े, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, संयोजक कविता सिंघल, नागपुरचे संघटनमंत्री शंकर इंगोले, संयोजक, आम आदमी पार्टी युवा आघाडी – विदर्भ पियुष आकरे, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, उत्तर नागपुर कॉर्डिनेटर रोशन डोंगरे, पश्चिम नागपुर संयोजक आकाश कावळे, पश्चिम नागपुर संघटनमंत्री हरीश गुरबानी आकाश काळे, अमोल हड़के, रविन्द्र गिधोड़े, सचिन लोनकर व इतर पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.