Published On : Fri, Mar 26th, 2021

खाजगी कोविड केंद्रातून शासनाच्या विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एमआयएमच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन

कामठी :- खाजगी रुग्णालयातील कोविंड केंद्रातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करून नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी एमआयएमच्या वतीने तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले

एमआयएम च्या वतीने तहसीलदार अरविंद हीगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,कामठी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला असून अनेक खाजगी रुग्णालयात शासनाच्या वतीने कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहेत त्या कोविड केंद्रात रुग्णाच्या नातेवाइकाकडून मोठ्या प्रमाणात खाजगी डॉक्टर पैशाची वसुली करीत असल्यामुळे नागरिकांना फार समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

त्यांच्या अनेक तक्रारी तालुका प्रशासनाकडे सुद्धा प्राप्त झाले आहेत ज्या खाजगी रुग्णालयातील कोविड केंद्रातून कोरोना रुग्णांना सेवा उपलब्ध होत आहे त्या रुग्णालयातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत योजना अंतर्गत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात केली आहे खाजगी रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली करीत आहे त्या रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन देतेवेळी एमआयएम नागपूर जिल्हा अध्यक्ष साकिबउर रहमान, कामठी तालुका अध्यक्ष मजाहीर अन्वर ,कामठी शहर अध्यक्ष मंगेश मेश्राम ,कामठी तालुका महासचिव मोहम्मद तसलीम ,शेख जावेद अनवर ,अब्दुल करीम सह मोठ्या संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी