Advertisement
कामठी : – शिव नगर कामठी येथील राजू सोनानी यांचे दुर्धर आजाराने नुकतेच आकस्मिक निधन झाले शासन नियमानुसार त्यांच्या पत्नीला राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य लाभ योजनेचा लाभ देण्यात आला
मृतकाच्या पत्नी जयमनी राजू सोनानी यांना नगरसेविका संध्या उज्वल रायबोले यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य लाभ योजना अंतर्गत वीस हजार रुपयांचा धनादेश मंजुरी पत्र देण्यात आले
यावेळी गोपाल सोनानी, विक्की बोंबले, विरेंद्र राऊत, राजेश पाटील,सुलोचना गजभिये,दिगलाल महानंद आदी उपस्थित होते
या शासकीय मदतीबद्दल जयमनी सोनानी यांनी तहसिलदार अरविंद हिंगे,नायब तहसिलदार आर टी ऊके आणि नगरसेविका संध्या उज्वल रायबोले यांचे आभार मानले