Published On : Fri, Dec 21st, 2018

टेकाडी ला राज्यस्तरीय महानुभाव पंथीय भव्य मेळावा

श्री दत्तजयंती निमित्य अखंड महानुभाविय हरिनाम सप्ताह

कन्हान : – दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्तप्रभूजयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह व यावर्षी राज्यस्तरीय भव्यदिव्य महानुभाव पंथीय मेळाव्याचे आयोजन श्रीकृष्ण मंदिर पंचकमेटी टेकाडी (को. ख) नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ व सावनेर तालुका महानुभाव मंडळ आणि टेकाडी ग्रामस्थ्य मंडळी यांच्या सयुक्त विदमाने आयोजित करण्यात आला आहे .

परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या कृपाप्रसादे, वैराग्यमूर्ती कै.प. पु.प.म श्री शेवातकर बाबा महानुभाव यांच्या प्रेरणेने , श्रध्देय गुरुजन , आचार्य, यांचे शुभचिंतन व वासनिक, नामधारक मंडळींच्या सहयोगाने, मागील ३२ वर्षां पासून होत असलेला हा महानुभाव पंथीय भव्य मेळावा यावर्षी टेकाडी (को.ख) ता.पारशिवणी जिल्हा. नागपूर येथे भव्य दिव्य मेळाव्याची सुरूवात सोमवार दि. २४/१२/२०१८ ला दुपारी ३ वाजता कन्हान पोलीस स्टेशन पासुन भव्य श्रीप्रभूंची पालखी व शोभयात्रेचा प्रारंभ होऊन नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने पायदळ शोभायात्रा कन्हान- कान्द्री-मुख्य मार्गाने टेकाडी गावात पोहचुन श्रीकृष्ण मंदिर स्थळी शोभायात्राचे समापन करण्यात येईल. तद्नंतर रात्री ८ वाजता सर्वज्ञ स्वरांगण म्युझिकल ग्रुप नागपूर द्वारा भजन संध्या कार्यक्रम सादर करण्यात येईल.

तसेच दररोज विविध अध्यात्मिक देवास, मंगलस्नान, उटी, प्रवचन, भगवतगिता पठन, कीर्तन अादी कार्यक्रम पंथीय संतमहंतांच्या सानिध्यात व मार्गदर्शनाखाली होणार आहेत. मंगळवार दि. २५/१२/२०१८ ला प्रात: काळ ६ वाजता देेवपुजेला मंगल स्नान, विडा अवसर, आरती सकाळी ७.३० वाजता श्रीमद भागवत गितापाठ.देशभरातून हजारोंच्या संख्येने महानुभाव पंथीय आचार्य, साधू, संत, वासनिक, नामधारक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ९. ३० वाजता धर्मसभा धर्म ध्वजारोहण, सभा मंडप उदघाटन, दिप प्रज्वलन व स्वागत समारंभ, ञानसत्र, आभार प्रदर्शन आणि दुपारी ४. ३० वाजता महाप्रसादाने मेळावा संपन्न होणार आहे.

करिता या चतुरविध साधनांच्या भेटकाल पर्वास-मेळाव्यास उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण मंदिर पंचकमेटी टेकाडी (को. ख) च्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.