Published On : Sat, Nov 18th, 2017

१९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धा

Advertisement
cycle ride

Representational Pic

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी सायकलिंग असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता स्थानिक संविधान चौकात राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा फक्त १८ वर्षावरील मुलांकरिता राहील. स्पर्धेचे उद्‌घाटन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते हील. यावेळी मनपा क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने उपस्थित राहतील. समारोपीय कार्यक्रम सकाळी ११ वाजता टिळकनगर बॉस्केटबॉल मैदान येथे होईल. यावेळी महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, प्रमोद कौरती, कमलेश चौधरी, प्रदीप उबाळे, अमर बागडे उपस्थित राहतील.

सदर स्पर्धेचा प्रारंभ संविधान चौकातून होईल. संविधान चौक ते कोंढाळी आणि तेथून परतून विद्यापीठ कॅम्पस असा सुमारे १०० कि.मी.चा सायकलिंगचा मार्ग राहील. स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पुरस्कार २० हजार रुपये, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार १० हजार रुपये, चतुर्थ पुरस्कार सात हजार रुपये तर पाचवा पुरस्कार पाच हजार रुपयांचा राहील. पाच उत्तेजनार्थ पुरस्कारही देणञयात येतील. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. बाहेर गावाहून येणाऱ्या स्पर्धकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था राणा प्रताप हॉल, शंकर नगर येथे करण्यात आल्याची माहिती ऑरेंज सिटी सायकलिंग असोशिएशनचे सचिव शंतनु मेश्राम, अध्यक्ष अशोक मेहरे, राज जांगडे, कुलदीप लोहे, दिलीप हनवते, हरिष खान, प्रशील सहारे,मुरलीधर माहुलकर, नितीन बडवाईक, देवा वाडीचार यांनी दिली.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement