Published On : Mon, Feb 8th, 2021

राष्ट्रसंत क्रीडा संकुलचा स्विमिंग टँक सुरु करा : चिखले

Advertisement

अति.आयुक्त जोशी यांना दिले निवेदन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल सुभाष रोड येथील स्विमिंग टँक लवकरात-लवकर सुरु करण्यासाठी क्रीडा विशेष समितीचे सभापती श्री. प्रमोद चिखले यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांना सोमवारी (८ फेब्रुवारी) ला निवेदन दिले.

यावेळी त्यांनी सांगितले की, प्रभाग क्र. १७-ड अंतर्गत येत असलेल्या “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” क्रीडा संकुल येथे नागपूर शहरातील मनपाचे एकमेव स्विमिंग टँक मागील दिड वर्षापासून दुरुस्तीच्या कार्यामुळे बंद आहे. यामुळे नागपूर शहरातील अनेक जलतरणपटटू तसेच पोहण्याचा सराव करणारे अनेक तैराकांची गैरसोय झालेली आहे.

आता या स्विमिंग टँकचे दुरुस्तीचे कार्य जवळ जवळ ९५ टक्के पुर्णत्वास आलेले असून फक्त फिल्टर प्लॅन्टचे कार्य बाकी आहे. उपरोक्त स्विमिंग टँक बंद असल्यामुळे मनपा नागपूरचे रु १५ ते २० लक्ष वार्षीक उत्पन्न सुध्दा थांबलेले आहे. उपरोक्त स्विमिंग टँकला सुरु करण्यास ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या ताबडतोब दुर करण्याचे संबंधीतांना निर्देश दिल्यास नागपूर शहरातील जलतरण पटटूंना या स्विमिंग टँकचा वापर करता येईल आणि नागपूर मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

यावेळी मोटघरे काका, रशिद भाई, राजेश जाधव, पंकज साळूंके, अभय बावने, प्रविण गायधने, मिथुन भोंदले, नरेन्द्र गौतम, संध्या आस्वले, मनिषा जिचकार, विभा सावंत, मंदा सारवे, कल्पना सुर्वे, कविता सुरुशे, मेघा शिन्दे, वर्षा सेलोकर, सुष्मा माटे इ. उपस्थित होते.