– शहर राष्ट्रवादीचे आंदोलन
नागपुर – बर्डी ते पारडी व बर्डी ते ऑटोमॅटिक चौक या दरम्यान मेट्रो संचलित करण्याचे काम पूर्ण झाले असतानाही या मार्गावर मेट्रो सुरु करण्यास मेट्रो प्रशासन चालढकल करीत असल्याने त्या विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मेट्रो भवन गेट समोर शहर अध्यक्ष श्री दुनेश्वर पेठे यांची नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
मेट्रो भवनाच्या गेट समोर नारे निदर्शने चा कार्यक्रम झाल्यावर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांचे सोबत सविस्तर चर्चा झाली असताना, त्यांनी स्पष्ट केले की “या मार्गावरचे काम पूर्ण झाले असले तरी जोपर्यंत राज्य व केंद्र सरकार अनुमती देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मेट्रो सुरु करू शकत नाही”.
मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना मेट्रोचे हे दोन्ही मार्ग दसऱ्यापर्यंत सुरू करण्याच्या आग्रह केला. तेव्हा सामान्य जनतेकडून दबाव असल्यामुळे मी आपल्या भावना सरकारला कळवितो व दसऱ्यापर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी शिष्टा मंडळास आश्वासन दिले.
यावेळी शेखर सावरबांधे, प्रशांत पवार, रमण ठवकर, अफजल फारुकी,श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, सतिश इटकेलवार, राजा बेग, महेंद्र भांगे, अशोक काटले, शिव बेंडे,प्रशांत बनकर, सुनील लांजेवार,अरविंद भाजीपाले, वसीम लाला, दिलीप पलांदुरकर, अमित पिचकाटे, आशुतोष बेलेकर, राजेश तिवारी, रेखाताई कृपाले, मंजू लाडेकर, भारतीय गायधने,सुकेशनी नारनवरे, , नारायण बोरीकर, कपिल नारनवरे, रियाज शेख,अर्शद अंसारी,मिर्झा जावेद बेग, नागेंद्र आठणकर,जुबेर कबीर, आकाश चिमणकर. इत्यादि कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.