Published On : Fri, Nov 2nd, 2018

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे धान व कापूस खरेदीस प्रारंभ

Advertisement

रामटेक : कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक च्या आवारात धान आणि कापूस काटापूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी मुख्य प्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले, सोहनलाल यादव व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मनिशजी जयस्वाल, अमोल खडसन,भगवान हटवार,रवी चवरे, या शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला.शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांनी “शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विकावा.

व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांचा माल विकताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच त्यांच्या मालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये यासाठी प्रयत्न करावे .तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याचीही काळजी घ्यावी आणि आणि शेतकऱ्यांना वेळेवर नगदी चुकारे दिले जातील यासाठी कटीबद्द राहावे असे विचार व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक यांनी “शेतकऱ्यांनि धान व कापुस बाजार समितीच्या बाजारात विक्रीसाठी आणावा आणि विकावा व बाजार समिती कडून ज्याकाही सुविधा मिळतात त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे यावेळी सांगितले.

“यावेळी शेतकरी, व्यापारी व रामटेक येथील मुख्य प्रशासक व संचालक मंडळाच्या हस्ते काटापूजन व धान खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी अशासकीय प्रशासक मंडळातील महेश बमनोटे ,खेलन पारखी ,सुंदरलाल ताकोत,कृष्णा मस्के,संजय गुप्ता,दिगंबर वैद्य, बुलाल वरखेडे,श्रीमती दुर्गा सरीयाम,प्रकाश मोहारे,सुधीर धुळे,चरणसिंग यादव,कृष्णा भाल,मोतीराम तरारे,कृष्णा रेड्डी,चंद्रभान धोटे, आदी संचालक मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव हनुमंता महाजन कर्मचारी वर्ग व रवी गायधने,बबन पोटभरे, कैलास गायधने,मनीष गुरव ,राजू काठोके,गजानन राठी , नीलकंठ महाजन,,रणवीर यादव, व इतर व्यापारी मंडळीही प्रामुख्याने उपस्थित होती.