Published On : Wed, May 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मेट्रोच्या पिलरला धडकली स्टार बस; ब्रेकखाली पाण्याची बॉटल आल्याने घडला अपघात

नागपूर : शहरात बुधवारी पहाटे स्टार बस मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चालक जखमी झाल्याने त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.तर अपघातात बसच्या समोरील काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे.

माहितीनुसार, आपली बस (एम एच ४० बीजी १०७९) ही आज पहाटे हिंगणा येथून मोरभवनकडे जात असताना नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयासमोर असलेल्या मेट्रोच्या पिलरला जबरन धडकली. बस चालवत असताना चालकाच्या पायाजवळ ब्रेकखाली पाण्याची बॉटल आल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. सुदैवाने चालकाला सोडून इतर कोणालाही जीवितहानी झालेली नाही.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement