Advertisement
तिरुपती:आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहेत.
वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाली. हजारो भाविक या दर्शनाचे टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत होते.
या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क इथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितले. त्यावेळी धावपळ घडून चेंगराचेंगरी झाली आणि त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला.
दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते आज तिरुपतीला जाणार आहेत. मात्र नायडूंनी या चेंगराचेंगरीप्रकरणी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.
गर्दीच्या हिशेबाने व्यवस्था का केली नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.