Published On : Sat, Oct 28th, 2017

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

MNS
मुंबई: मालाड पश्चिम विभागाचे मनसेचे अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेर‍ीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर मनसेविरुद्ध फेरीवाले असा वाद आता चिघळण्याची शक्यता आला. या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली असून मनसैनिकांनी दादरमध्ये फेरीवाल्यांचे स्टॉल उधळून लावले.

दुसरीकडे, मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुशांत माळवदे यांच्यावर आज (शनिवार) दुपारी साडे तीन वाजता मालाड रेल्वे स्टेशनबाहेर जीवघेणा हल्ला करण्‍यात आला. या हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज ठाकरे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

Advertisement

सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला. माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या चिथावनीखोर वक्तव्यानंतर सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला झाल्याचे मनसेने आरोप केला आहे. मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना हप्ते मागत होते, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement