मुंबई : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येईल.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 30 जुलैपर्यंत घेण्यात येईल. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत घेण्यात येईल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) व्यवसाय अभ्यासक्रम पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 31 जुलैपर्यंत घेण्यात येईल.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





