Advertisement
नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (एसएसबी) मंगळवारी एका हॉटेलमधून 105 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करून सात जणांना अटक केली.
एसएसबीच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमडीची मुंबईतून शहरात तस्करी करण्यात आली होती. स्थानिक हॉटेलमध्ये पेडलर त्याचे वितरण करत होते. यासंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये छापेमारी केली.
यादरम्यान सात आरोपी एमडी ड्रग वाटप करताना सापडले. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.