Published On : Tue, Jan 1st, 2019

श्रीसंत गजानन महाराज नागपुर ते रामटेक पायी पायदळ पालखी यात्रा

Advertisement

कन्हान : – श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी तीन खंबा चौक नागपुर व्दारे “श्री “चे रामटेक भेट प्रसंगाची आठवण सोहळा म्हणुन १२ व्या वर्षी नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी पायदळ दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन काली मंदीर सत्रापुर कन्हान ला मुक्काम व भव्य स्वागत करण्यात येणार आहे .

श्री सदगुरू गजानन बाबांचे वास्तव्य नागपुरला श्री गोपाळ बुटी यांचे वाडयात असताना श्री भक्त हरी कुकाजी पाटील त्यांना परत नेण्याकरिता आले व नंतर ५ जानेवारी १९०९ रोजी सदगुरू गजानन बाबा सोबत ते रामटेक ला गेले. तेव्हा श्री रामभक्त शंकरबुवा रामटेक गडमंदीर वर प्रभु श्रीरामांच्या प्रत्यक्ष दर्शनाकरिता १२ वर्षापासून तप करित होते . त्यांचे नित्यनेम प्रभु श्री रामाचा जप व गडमंदीर परिसराची साफसफाई करित होते .

श्री गजानन बाबा गडावर पोहोचले त्या वेळेस शंकरबुवा हाती झाडु घेऊन मुखाने श्री रामाचा जप करित आंनदाने स्वच्छतेचे कार्य करीत असताना त्यांनी पाहिले की , कोदंडधारी वनवासी जटाजुट असलेले श्रीराम साक्षात गडावर येत आहेत. त्याचा हातातला झाडु जमिनीवर पडला व ते प्रभु रामाच्या पायावर लोटले . आपल्या नेत्रातील अश्रुधारांनी प्रभुच्या पायाचा अभिषेक केला. व परत उठुन पाहिले तर समोर गजानन बाबा दिंगाबर अवस्थे मध्ये दिसले. परत डोळे मिटून उघडले तो साक्षात पिंताबरधारी श्रीराम उभे हा भक्त व भगवंत यांच्या भेटीचा सोहळा बराच वेळ चालला . सदगुरू गजानन बाबानी शंकरबुवांना घट्ट आलिंगन व आर्शिवाद दिला .

हा प्रसंग म्हणजे “जीव आणि शिव ” याची एकात्मता . या प्रसंगाची आठवण प्रत्येक भक्ताला व्हावी म्हणुन “श्री” ची छोटीशी सेवा या निमित्ताने व्हावी यास्तव श्री गजानन महाराज सेवा समिती टिमकी तीन खंबा चौक नागपुर व्दारे दि ३ जानेवारी २०१९ रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी यात्रा टिमकी तिन खंबा चौक नागपुर श्री हरिहर गजानन निवास येथुन प्रस्थान होऊन श्री गजानन मंदीर प्रेम नगर, भवानी मंदीर कळमना मार्गे दुपारी १ वाजता कामठी ला आगमन व मिरवणूक दुपारी ३.३० वाजता राम मंदिर कामठी येथे जेवण, प्रवचन व अल्प विश्रांती .

सायंकाळी ५.४५ ला काली मंदीर कन्हान भव्य स्वागतासह आगमन रात्री ७ ते ८.३० किर्तन महाप्रसाद व मुक्काम. शुक्रवार दि ४ जानेवारी ला सकाळी ६.३० वाजता मंदीरातुन पालखी प्रस्थान कन्हान शहर प्रदक्षिणा वेळी कन्हान शहर विकास मंच, कॉंग्रेस कमेटी , गणेश नगर वाशी , गणेश मंदीर समिती च्या वतीने चहा , बिस्कीट, फळ वितरण, श्री गजानन सॉ मिल व्दारे नास्ता चाय , ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे काफीचे वितरण करून पुष्पाने पालखी व भाविकांचे भव्य करण्यात येईल.

सितला माता मंदीर कांद्री , संताजी नगर, श्री आकरे निवास येथे सकाळी ९.१५ नास्ता व भव्य स्वागत करून जे एन दवाखाना वरून सकाळी ११.१५ वाजता बोरडा आगमन, महाप्रसाद, प्रवचन दुपारी ४ वाजता नगरधन किल्ला येथे विसावा , ५. ४५ ला नगरधन भ्रमण श्री मोहिते हॉल नगरधन येथे ६.३० ते ८. ३० वाजता किर्तन, महाप्रसाद व मुक्काम. दि.५ जानेवारी २०१९ ला श्रीक्षेत्र रामटेक येथे आगमन व दि ६ जानेवारी रोजी गोपाल काल्याचे किर्तन व समापन होऊन पालखी यात्रा परत येईल.

श्रीसंत गजानन महाराज नागपुर ते रामटेक पायी पायदळ पालखी यात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी होऊन श्री गजानन महाराजांचे सोबत प्रभु श्री रामाच्या दर्शनाचा लाभ घेऊन या मंगल प्रसंगाची आठवण साकार करावी . असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी तीन खंबा चौक नागपुर व्दारे करण्यात आले आहे .