Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती

दहाही झोनमध्ये अभियानाला उदंड प्रतिसाद

नागपूर : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचा शुभारंभ केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यांच्या नेतृत्तवात या चित्ररथाच्या माध्यमातून दहाही झोनमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

भारतीय संविधानाबाबत जागरुकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सवाची नागपूर शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे संविधान चित्ररथ तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून २७ जानेवारीपासून दररोज शहराच्या विविध भागात मनपा झोननिहाय जनजागृती केली जात आहे. याच श्रृंखलेत गुरुवारी (ता. ३०) सकाळी १० ते १२ दरम्यान सतरंजीपुरा व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लकडगंज झोन येथे हे अभियान राबविण्यात आले.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे भारतीय संविधानावर आधारित आकर्षक चित्ररथ तयार करण्यात आले होते. त्याच चित्ररथाच्या माध्यमातून मनपातर्फे २७ जानेवारीपासून शहराच्या विविध भागात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. आतापर्यंत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरू नगर व गांधाबाग या झोनमध्ये जानजागृती अभियान रावण्यात आले आहे. ३० रोजी सतरंजीपुरा झोन अंतर्गत येत असलेल्या विट भट्टी, पारडी उड्डाण पूल, ऑटोमोटिव्ह चौक येथे सकाळी १० ते १२ दरम्यान चित्र रथ फिरवून जनजागृती करण्यात आली. तसेच सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान लकडगंज झोन अंतर्गत कच्छी विसा मैदानात जनजागृती अभियान राबवण्यात आले.

Advertisement