Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

हुतात्मांना मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर : भारताच्या स्वातंत्र्याकरीता असंख्य देशभक्तांची प्राणार्पंण केले अशा हुतात्मा देशभक्तांचे स्मरण करुन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन मिनिट मौन पाळून हुतात्मा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला तसेच थोर हुतात्म्यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी.चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, सहायक अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.

Gold Rate
Mar 12 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,900/-
Gold 22 KT ₹ 1,49,600 /-
Silver/Kg ₹ 2,65,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरात विविध ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला देखील मनपाद्वारे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि गांधीसागर बालोद्यान येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, श्री शैलेश जांभुळकर, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे श्री. राजेश कुंभलकर, डॉ. पांडे यांच्यासह पोलिस आणि अग्निशमक दलाचे जवान यांनी हुतात्मांच्या स्मृतींना अभिवादन केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement