Published On : Mon, Jun 14th, 2021

क्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा

Advertisement

– कामठी शहरात लवकरच फुटबॉल स्टेडियम सुरू करणार-मंत्री सुनील केदार

कामठी: मार्च पासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व अर्थचक्रसह विकासाची गती मंदावली होती.अंशतः कोरोनाचा प्रकोप कमी झाला असल्याने रखडलेल्या विकासकामांना गती मिळावा , लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविणे या मुख्य उद्देशाने राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज 14 जून ला सकाळी 10 वाजता कामठी तालुका आढावा सभा आयोजित करण्यात आली होती .या आढावा सभेत अधिकाऱ्यांना धारेवर घेण्यापेक्षा नागरिकांच्या समस्येला न्याय देणे यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून योग्य सोडवनुक कशी व केव्हा होईल यावर भर देण्यात आला.तसेच कामठी शहराला फुटबॉल ची नर्सरी संबोधले जाते तेव्हा येथील नागरिकांच्या उपेक्षित मागनिला न्याय देत शहरात लवकरच फुटबॉल स्टेडियम सुरू करणार असल्याचे मनोगत क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी तालुकास्तरीय आढावा बैठकीत व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे, माजी जी प सदस्य प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, जी प सदस्य तापेश्वर वैद्य, माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, जी प चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, एसडीओ श्याम मदनूरकर, तहसिलदार अरविंद हिंगे यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान या आढावा सभेला कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर हे उशिरा उपस्थित झाल्याने त्यांना व्यासपीठावरील पहिल्या रांगेतील शेवटच्या आसन बैठकीवर आसन ग्रहण करावे यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी आमदार सावरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला गेले असता या स्वागताचा अस्वीकार करीत शेवटच्या बाकावर आसन ग्रहण करण्यात आल्याचा नाराजगीचा सूर वाहला व कार्यक्रमातून बाहेर पडत कार्यक्रमाचा निषेध नोंदवीत असता उपस्थित कांग्रेस च्या पदाधिकारी व आमदार सावरकर यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाने ही आढावा सभा चांगलीच वादळी ठरली तर या आढावा सभेत राजकीय अखाडा रंगल्याचे चित्र निर्माण झाले होते.

आजच्या तालुकास्तरीय आढावा सभेत एकूण 17 विषयावर आढावा घेण्यात आला.ज्यामध्ये कामठी तालुक्यातील पाणी टंचाई अंतर्गत मंजूर कामाचा आढावा,कोविड 19 च्या अनुषंगाने 18 वर्षावरील मुलांच्या उपचाराकरिता केलेली उपाययोजना, सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करणे,महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागाकडील वीज जोडनिचा आढावा,खरीप हंगाम 2021 करिता बी बियाणे व खतांची उपलब्धता,जी प व एन एम आर डी ए कडील घरकुल बांधकाम आढावा, रुअर्बन योजनेचा आढावा, पीक कर्ज वाटपाचा आढावा, पीक विमा योजनेचा आढावा,मागील दोन वर्षात मंजूर झालेल्या स्थानिक जल संधारणचे कामाचा आढावा, कालवा दुरुस्तीचा आढावा, नदी काठच्या गावांचा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा,जिल्हा परिषद कडील मंजूर संपूर्ण कामाचा आढावा,भूमी अभिलेख विभागाकडील मोजणी प्रकरणाचा आढावा चा समावेश होता.

आजची आढावा सभा ही राजकीय आखाड्याची सभा नसून विकासाला गती देण्यासाठी म्हणून ह्या आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.नागरिकांच्या समस्येचे निराकरण होत नसून समस्येचे प्रकरण प्रलंबीत असल्याने या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिकारी व शासन समोरासमोर येतात व नागरिकांच्या समस्येचे निराकरण करून देणे हे येथील लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहे त्याला नाकारता येत नाही ।मात्र काही लोकप्रतीनिधी स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करून यावर राजकीय अखाडा रंगवतात यावर मंत्री सुनील केदार यांनी खंत व्यक्त केली.

 

शासकीय आढावा बैठक की काँग्रेसचा मेळावा आमदार टेकचंद सावरकर यांनी केला बैठकीचा निषेध

दिनांक१४/०६/२०२१ रोजी महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार यांनी कामठी तालुक्याच्या सर्व शासकीय विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज रॉयल लॉन येथे करण्यात आले होते या बैठकीला कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते निमंत्रण नुसार व कामठी विधानसभेच्या आमदार या नात्याने आमदार टेकचंद सावरकर यांनी बैठकीला उपस्थिती दर्शवली परंतु बैठकीला गेल्यावर सदर बैठक शासकीय विभागाची की काँग्रेसचा मेळावा असा प्रश्न आमदार टेकचंद सावरकर यांनी उपस्थित केला याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर बोलत असताना सांगितले की शिष्टाचारानुसार त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही तसेच कोणत्याही शासकीय व संवेधानिक पदावर नसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर मुख्य स्थानी बसवन्यात आले होते व संविधानिक पदावर असलेल्या सन्माननीय सदस्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते या सर्व प्रकाराबाबत आमदार टेकचंद सावरकर यांनी मंत्री सुनील केदार यांना विचारणा केली असता मंत्री सुनील केदार यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार टेकचंद सावरकर तुम्हाला बोलता येणार नाही अशा अर्वाच्य भाषेत बोलून त्यांचा अपमान केला प्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांनीसुद्धा प्रत्युत्तर देत कामठी विधानसभेचा आमदार या नात्याने मला बोलण्याचा अधिकार आहे आणि माझा आवाज कोणी दाबू शकत नाही असे खडेबोल मंत्री सुनील केदार यांना सुनावले व बैठकीचा निषेध करत सर्व भारतीय जनता पार्टीच्या संविधानिक पदावर असलेल्या पदाधिकार्यांसह बैठकीतून निघून गेले.

कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोगत
आमदार साहेब राजकीय नैराश्यापोटी चुकीचे आरोप करतात आहेत स्वतः तहसीलदार साहेब हे आमदार साहेबांच स्वागत करायला गेलें होते त्यांनी तहसीलदार साहेबाना झिडकारलं असा सरकारी अधिकाऱ्याचा अपमान करणे बरोबर नाही.त्यांनी आघाडी सरकारचा निषेध करावा तो त्यांचा हक्क आहे.मंत्री महोदय यांनी आधी मला आढावा घेऊद्या व नंतर तुम्ही बोला असे आमदार साहेबाना सांगितले. *अशा सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या आमदाराचा निषेध असो

मंत्री सुनिल बाबु केदार यांचा तर्फे कामठी तालुक़ा आढावा बैठक घेन्यात आली त्या मधे आमदार टेकचंद सावरकर यानी अड़थळा निर्माण करुण गोधंळ घातला त्याला प्रतिउत्तर म्हनून कामठी विधानसभेचे नेते माज़ी अध्यक्ष ज़िल्हा परिषद सुरेशजी भोयर यांनी आमदर सावरकर यांना सुनावले।