Published On : Mon, Jul 15th, 2019

क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी स्वीकारला पदभार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी सोमवारी (ता.१५) पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील क्रीडा समिती सभापतींच्या कक्षापुढील बॅडमिंटन कोर्टच्या आवारात आयोजित पदग्रहण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, मावळते क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, क्रीडा समितीच्या उपसभापती मनिषा कोठे, समिती सदस्या कांता रारोकर, सरला नायक, सदस्य सुनील हिरणवार, नगरसेवक राजेश घोडपागे, विजय चुटेले, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, लता काडगाये, उपायुक्त राजेश मोहिते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, क्रीडा समिती ही महत्वाची समिती आहे. शहरात क्रीडा विषयक वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आहे. नागपूर शहरातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी क्रीडा समितीतर्फे प्रयत्न करण्यात यावेत. मावळते क्रीडा समिती सभापती यांनी क्रीडा समितीच्या माध्यमातून शहरात क्रीडा वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक महत्वाचे कार्य केले आहेत. हे कार्य पुढे चालू राहावे यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकातून मावळते क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी मागील दोन वर्षातील अनुभव कथन केला व नवनिर्वाचित सभापती प्रमोद चिखले यांना कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यावेळी म्हणाले, शहरात उत्तम खेळाडू निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व कार्य समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. पक्षाने विश्वास दाखवून जी जबाबदारी सोपविली तिला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. आपल्या शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू निर्माण व्हावेत व क्रीडा विषयक कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले तर क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल यांनी आभार मानले.