Advertisement
नागपूर : एकीकडे नागपुरात उन्हाचा पारा चढलेला असताना काल पडलेल्या तुरळक सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आठवड्यापासून अधिक काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने काल हजेरी लावल्याने नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील तापमानाचा पारा ४० वरून ३४ अंशावर घसरल्याचे दिसते.