Published On : Sat, Feb 17th, 2018

खसाळा गावात ‘गाव भेट योजने ‘ ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

कामठी: शासनाच्या कल्याणकारी योजना ह्या समाजातोल तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटीबद्ध असून गावातील कामे गावातच व्हावी व ग्रामस्थांना सोयी सुविधा प्राप्त होत नागरिक शासनाच्या कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी, समाधान शिबीर सारखे उपक्रम राबविण्यात आले आता याच शासन आपल्या दारी या धर्तीवर समाधान योजनेचा एक भाग म्हणून काही निवडक योजना तालुक्यातील प्रत्येक महिन्यात 12 गावांमध्ये राबविण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी च्या आदेशानव्ये आखण्यात आला असून यानुसार महाराजसव अभियान 2018 अंतर्गत ‘गाव भेट’ योजना राबविण्यात येत आहे .ज्यानुसार आज 16 फेब्रुवारीला पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेले कामठी तालुक्यातील खसाळा गावात सरपंच रवी पारधी यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार सुनील तरुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आलेल्या ‘गाव भेट योजनेला ‘ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ज्यामध्ये तहसीलदार बाळासाहेब टेळे, बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनी उपस्थिती दर्शवून गाव भेट योजनेचे नेतृत्व केले व ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेबाबत मौलिक असे मार्गदर्शन केले.यावेळी , नायब तहसिलदार सुनील तरुडकर ,विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, निवडनुक विभागाचे नितीन टेंभुरने, मंडळ अधिकारी , तलाठी जी एल गाखरे,पुरवठा निरीक्षक रमेश खेडकर, नीलिमा उरकुडे, विनायक गभने, सुभाष भोयर,गजानन वैरागडे, यासह ग्रामपंचायत उपसरपंच व समस्त ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
20 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,47,200/-
Gold 22 KT ₹ 1,36,900 /-
Silver/Kg ₹ 3,10,400 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराजसव अभियान 2018 अंतर्गत खसाळा गावात ‘ गाव भेट योजना’अंतर्गत दिलेल्या भेटीत उपरोक्त उपस्थित अधिकारी वर्ग तसेच तहसीलचे विविध विभागातील प्रशासनिक अधिकारी व पथक यांनी गावात प्रत्येक घरी भेट देऊन शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली तसेच उपलब्ध नसलेल्या शासकीय कागदपत्रांची त्वरित सोय करीत जुळवाजुळव करण्यात आली.

या गाव भेट योजनन्तर्गत , संजय गांधी योजनेचे 2अर्ज स्वीकारन्यात आले,शिधापत्रिका संदर्भात 16 नवीन रेशन कार्ड बनविण्यात आले , 3 लाभार्थ्यांचे नाव दुरुस्ती करण्यात आले, 40 लाभार्थ्यांचे नाव नूतनीकरण करण्यात आले निवडणूक विभागाचे फॉर्म नं 6 व फॉर्म नं 8 चे प्रत्येकी 1 अर्ज भरण्यात आले , 30 लाभार्थ्यांना प्रतिज्ञापत्र ,तसेच 18 जनाना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात आले तर ओबीसी चे 3 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले . तसेच संजय गांधी योजनेचे चावडी वाचन करण्यात आले तसेच महसूल चे 7/12 वाटप करण्यात आले.

या गाव भेट योजनेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सरपंच रवी पारधी, उपसरपंच सुनीता वैरागडे, अश्विन गभने, मुकेश इंगोले, अमोल वाघमारे, देवेंद्र टेकाम, छाया सावरकर, छबु रोकडे, मीना चौधरी, अरुणा तभाणे, सुभाष भोयर, नागेश इंगोले, गजानन वैरागडे, देवरवजी डाखोळे, साबूजी गभने, सचिन बावनकुळे, गुणवंत दिवाने,संतोष सराड,बंडु चौधरी, जितु रोकडे, अर्जुन इंगोले,धनंजय इंगोले,वसंत सावरकर या सह महसूल विभागाचे समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement