Published On : Tue, Feb 23rd, 2021

एअरपोर्ट ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान शटल बस सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रवाश्यांसोबतच नागपूर विमानतळ कर्मचारी देखील घेत आहेत या सेवेचा लाभ

नागपूर : महा मेट्रो तर्फे बाबासाहेब आंबेडकर नागपुर विमानतळावरून सुरु झालेल्या फिडर बस सेवेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यातुन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या नित्य नेमाने वाढतच आहे. विमानतळ ते एयर पोर्ट मेट्रो स्टेशन आणि एयर पोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ अशी फिडर सेवा महा मेट्रो नागपूरने सुरु केली असून रोज किमान ६० प्रवासी या माध्यमाने प्रवास करीत आहेत.

सहाव्या वर्धापन दिवस साजरा करताना महा मेट्रो तर्फे मागील आठवड्यात हि फीडर सेवा म्हणजे शटल बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. महा मेट्रो, नागपूर महानगर पालिका व मिहान इंडिया लिमिटेड च्या संयुक्त विद्यमानाने हि सेवा सुरु झाली आहे. १८ फेब्रुवारी रोजी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संस्थापक डॉ. ब्रिजेश दीक्षित ह्यांनी फित कापून या बस सेवेचे उद्घाटन केले होते. दिल्ली, मुंबई आणि देशातील अन्य शहरांतून हवाई मार्गे नागपुरात येणाऱ्या प्रवाश्यांकरता हि सेवा अतिशय सुटसुटीत असून विमानतळ ते मेट्रो स्टेशन आणि पुढे मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी असा प्रवास अतिशय कमी दरात होत असल्याने हि सेवा लोकप्रिय ठरते आहे.

विमानतळावर उपलब्ध प्रवासाच्या अन्य साधनांच्या तुलनेने फिडर बस सेवा अतिशय स्वस्त असल्याने केवळ हवाई प्रवास करून नागपुरात येणारे प्रवासीच नव्हे तर नागपूर विमानतळावर कार्यरत कर्मचारी देखील या सेवेचा मोठ्या प्रमाणात वापरत करित आहेत. नागपुरात येणाऱ्या प्रत्येक विमानाच्या वेळेवर फिडर बस विमानतळाच्या पार्किंग येथे उपलब्ध असल्याने त्या माध्यमाने एअर पोर्ट मेट्रो स्टेशन वर जाणाऱ्या प्रवाश्यांकरता हि अतिशय उपयुक्त सोय झाली आहे. शिवाय विमानाने प्रवास करणारे प्रवासी आता एअर पोर्ट मेट्रो स्टेशनवरून विमानतळ येथे थेट याच फिडर बसने प्रवास करू शकतात.

या शिवाय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हि सेवा इलेक्ट्रिक बसच्या माध्यमाने होत असल्याने कुठलेही प्रदूषण यामुळे होत नाही. एकूणच हा सगळा प्रवास अतिशय कमी वेळातच नव्हे तर स्वस्तात होत असल्याने वेळे सोबतच पैश्याची बचत देखील होते आहे.

सोबतच पर्यावरण संतुलन राखण्यात देखील या निमित्ताने हातभार लागत आहे. या सोबत महत्वाचे म्हणजे मेट्रो ट्रेन आणि फिडर बस सेवेच्या सोईंमुळे आता विमानतळावर जाणाऱ्यांना वैयक्तिक वाहन वापरण्याची गरज नसल्याने या माध्यमाने देखील रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यात मदत मिळेल. विमानतळावर उतरणाऱ्या नागरिकांना किंवा विमानतळावर जाण्यासाठी शहरभरातुन मेट्रोने प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांसाठी हा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर झाला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement