Published On : Thu, Jun 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाडीत भरधाव कारचा थरार; तीन दुचाक्यांना चिरडले, युवकाला ४०० मीटर फरफटत नेले

Advertisement

नागपूर : वाडी येथील भाजी मंडई परिसरात मंगळवारी उशिरा रात्री भरधाव कारने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगातील कारने सलग तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. यातील एका स्कूटीस्वाराला कारने तब्बल ४०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडीतील भाजी मंडई परिसरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने प्रथम एका स्कूटीला धडक दिली. धडकेनंतरही चालकाने वाहन न थांबवता वेग कायम ठेवला. यामुळे स्कूटीस्वार कारसोबत ओढला जात नाका क्रमांक १० पर्यंत पोहोचल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात वाडीतील रहिवासी पंकज शामकुंवर गंभीर जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातावेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Advertisement

अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याचेही सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. मात्र, घटनेनंतर अनेक तास उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या पोलिसांकडून कारचालकाचा शोध सुरू असून अपघातामागील नेमके कारण आणि चालक खरोखर मद्यधुंद होता का, याचा तपास केला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे वाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges