नागपूर : नागपूरच्या विकासाला नवी दिशा देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या कार्गो हब प्रकल्पालाही नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर विमानतळाच्या ग्राउंड फील्ड प्रकल्पांतर्गत आज हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे नागपूरला जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले आधुनिक विमानतळ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता जीएमआरच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे.
यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, नागपूरला देशातील महत्त्वाचे कार्गो हब बनविण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. मात्र, विमानतळाशी संबंधित तांत्रिक आणि न्यायालयीन अडथळ्यांमुळे हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता. आता त्या सर्व अडचणी दूर झाल्याने प्रकल्पाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयास येईल. या प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, कृषी आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच विदर्भाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, एका वेगळ्या विषयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धमकीच्या भाषेवर कठोर भूमिका घेतली. “कोणाचेही घर बॉम्बने उडवण्याची भाषा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अशा पोकळ धमक्यांना नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप
भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप
मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News
Ratnagiri: लोटे MIDC की बदहाल सड़कों पर पहुंचे Aaditya Thackeray #MaharashtraNews
Mohan Bhagwat के America दौरे पर Sanjay Raut का बड़ा बयान! #SanjayRaut...
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...





