नागपूर – शनिवारी रात्री मानेवाडा ते तुकडोजी चौक मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार युवक गंभीर जखमी झाले. एका कारने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक नियंत्रण गमावले.
कार एवढ्या वेगात होती की ती थेट डिव्हायडरला धडकली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली. या धडकेनंतर गाडीतील चारही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक चौकशीत अपघातग्रस्त कार चालवणारा एक युवक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि चालकाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर काही काळ परिसरातील वाहतूकही ठप्प झाली होती.