Published On : Thu, Jun 20th, 2019

पिवळी मारबत डीपी रोडच्या कामाला गती द्या – उपमहापौर दीपराज पार्डीकर

Advertisement

पाचपावली पूल, नाईक तलाव परिसराची केली पाहणी

नागपूर: . पिवळी मारबत ते पाचपावली चौक डीपी रोड रूंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील काम संथगतीने सुरू आहे. सर्व प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून डीपी रोडच्या कामाला गती द्या, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. बुधवारी (ता.१९) उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी पाचपावली पूल, पिवळी मारबत रोड, नाईक तलाव, नाईक तलाव बाजाराची पाहणी केली.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्यांच्या समवेत सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इजराईल, बाजार विभागाचे श्रीकांत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.

पिवळी मारबत ते पाचपावली डीपी रोडच्या ८० फुट रूंदीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. त्याबाबतीत प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. परंतु, त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली नाही. याशिवाय रस्त्यावर अतिक्रमणाचीही समस्या आहे. त्यामुळे रस्त्यातील अतिक्रमण तातडीने हटविण्याची कार्यवाही करून रस्त्यामध्ये येणा-या घरांना नोटीस देण्याचेही निर्देश उपमहापौरांनी यावेळी बोलताना दिले.

नाईक तलावाच्या लगत असलेला बाजार महापालिकेने बांधून दिला आहे. तो बाजार हस्तांतरित करण्याचे काम रखडलेले आहे. त्याला देखील गती देण्यात यावी. बाजारातील विक्रेत्यांना कायमस्वरूपी ओटे लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत, असेही उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी नाईक तलावाची पाहणी केली. नाईक तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ७५ लाख मंजूर झालेले आहेत. या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडे डीपीआर पाठविला असून लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मोहम्मद ईजराईल यांनी दिली. नाईक तलावाच्या लगतच नाईक तलाव एसटीपी प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement