Published On : Thu, Jun 20th, 2019

खरिप हंगाम कृषी पीककर्ज मेळावा कन्हान ला संपन्न.

Advertisement

२२ शेतकऱ्याना २६ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वितरण.

कन्हान : – ग्रामीण भागातील शेतकऱ्या ना बँकेच्या वतीने कृषी पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्या ना त्यांच्या गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात कन्हान नगरपरिषद सभागृह येथे फेरफार अदालत व खरीप हंगाम कृषी पीक कर्ज मेळावा संपन्न झाला .

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तहसिल कार्यालय पारशिवनी व्दारे नगर परिषद सभागृह कन्हान येथे मंगळवार दि.१८जुन २०१९ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मा.जोगेंद्र कटियारे उपविभागीय अधिकारी रामटेक व मा.वरूनकुमार सहारे तहसिलदार पारशिवनी यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मा. प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात कृषी पीककर्ज वितरण अभियान २०१९ अंतर्गत खरिप हंगाम कृषी पीककर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात कन्हान मंडळ अंतर्गत फेरफार अदालत मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र – ५४, चेक वाटप – ३, ग्रामीण शेतकऱ्याना ७/१२ वाटप – २३, ८अ वाटप – २१, कर्ज माफीचे १४ शेतक-यांना फेरफार प्रमाणित करण्यात आले .

तसेच खरिप पिक कर्ज मेेळाव्यात युनियन बँक कांद्री-कन्हान व्दारे ९ शेतकऱ्याना १२ लाख ,सेन्ट्रल बैक कन्हान – एका शेतकऱ्याला ६४ हजार रुपये, स्टेट बँक कन्हान – २ शेतकऱ्याला ४लाख, पंजाब नेशनल बैक ५ शेतकऱ्या ला ५ लाख, इंडियन बैक कामठी कालरी – एक शेतकऱ्याला ६०हजार, नागपुर जिल्हा सहकारी बँक कन्हान – २ शेतकऱ्याला १ लाख २० हजार रुपये, नागपुर जिल्हा सहकारी बँक पारशिवनी – २ शेतकऱ्याला १ लाख २० हजार रुपये असे एकुण २३ शेतकऱ्याला २६ लाख ६४ हजार रुपयांचे कृषी पीक कर्ज वाटप करण्यात आले. मेळाव्यात कन्हान परिसरातील ५५ शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन योजनेचा लाभ घेतला. या खरिप हंगाम कृषी पीककर्ज मेळाव्याच्या यशस्वीते करिता नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे, सहाय्यक निबंधक कार्यालय पारशिवनी गणेश कुटे, मंडळ अधिकारी जगदीश मेश्राम, तलाठी – महेंद्र श्रीरसागर, गिरडकर, शितल गौर मॅडम, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, कोतवाल चंद्रमनी वाहणे, गौतम राहुल, राजेश पाटील, सेवक सह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement