Published On : Thu, Jun 20th, 2019

विश्व योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

Advertisement

महापौर नंदा जिचकार यांनी घेतला तयारीचा आढावा

नागपूर : नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्र संगठन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शहरातील विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी आयोजित विश्व योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी २१ जून रोजी शहरातील यशवंत स्टेडियम येथे होणा-या विश्व योग दिनाच्या तयारीचा बुधवारी (ता.१९) महापौर नंदा जिचकार यांनी आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कार्यक्रमाचे संयोजक उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका रुपा रॉय, उज्ज्वला शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त महेश मोरोणे, प्रकाश वराडे, गणेश राठोड, विजय हुमने, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, नेहरू युवा केंद्र संगठन नागपूरचे उपनिदेशक शरद साळुंके, नेहरू युवा केंद्र संघठनचे जिल्हा युवा समन्वयक हितेंद्र वैद्य, गौरव दलाल, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिरसीकर, योगाभ्यासी मंडळाचे अतुल मुजुमदार, गोपेश जारगर, पतंजली योग समितीचे सर्वश्री प्रदीप काटेकर, छाजुराम शर्मा, विवेक बहुजन हिताय कल्याणकारी संस्थेचे देवराव सवाईथुल, आय.एन.ओ.च्या सचिव सुवर्णा मानेकर, अश्वीन जव्हेरी, श्री. योग साधना केंद्रचे डॉ. प्रभाकर मस्के, के.जी. पोटे, सतीश भुरे, डॉ. गंगाधर कडू, युनिटी एस.ए.चे संजय निकुले, नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहगावकर, वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, हर्टफुलनेस इन्स्टिट्युटचे श्रीकांत अण्णारपा, योगसुत्रा वे ऑफ लाईफ संस्थेच्या सुनीता वाधवान, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे ज्ञानेश्वर गुरव, ओशोधारा संघ नागपूरचे संजय कटकमवार, महेंद्र नागपाल, सहजयोग ध्यान केंद्राचे महेश धांदेकर, सागर शिंदे, प्रदीप नवारे, आदित्य पैदलवार, प्रतीक आग्रे, अमित योगासन मंडळाचे संदेश खरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व विविध योग संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील यशवंत स्टेडियम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही योग दिनानिमित्त भव्य आयोजन होत आहे. शहरातील विविध योग संस्थां, मंडळांचा येथे उत्स्फुर्त सहभाग असल्याने कार्यक्रम स्थळी हजारोंची गर्दी राहणार आहे. या सर्व योग संस्थांचे प्रतिनिधी, योग साधकांची कोणतीही गैरसोय होउ नये यासाठी योग्य नियोजन करणे, शिवाय कार्यक्रम स्थळी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह संपूर्ण परिसरात स्वच्छता राखली जावी, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

शुक्रवारी २१ जून रोजी सकाळी ५.४५ वाजता विश्व योग दिनाच्या कार्यक्रमाला सुरूवात होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. महापौर नंदा जिचकार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवितील.

योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणा-या सर्वांना मैदानात जाण्याकरीता मुख्यद्वारातून प्रवेश करावा लागणार आहे. यानंतर स्टेडियमवर जाण्यासाठी प्रवेश द्वार क्रमांक २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११ आणि १४ मधून प्रवेश करता येईल. कार्यक्रमात सहभागी होणा-या सर्व योग साधकांनी श्वेत वस्त्र परिधान करून यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.