Published On : Wed, Jun 9th, 2021

बसपा च्या नगराध्यक्ष बनावो अभियानाला गती

कामठी :- कामठीनगर परिषद निवडणुकीला ध्यानात घेऊन राज्याचे महासचिव मा .नागोराव जयकर यांनी कामठी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना निर्देश दिले ,की कोणत्याही परिस्थितीमध्ये कामठी नगर परिषद ची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. त्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टी च्या वतीने कामठी शहरामध्ये” नगराध्यक्ष बनावो “अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

त्यासाठी बहुजन समाज पार्टी ने ऑइल पेंट ने पेंटिंग सुरू केलेली आहे ती पेंटिंग सध्या कामठी शहरामध्ये आकर्षणाचा केंद्र बनलं आहे. मागच्या 15 वर्षापासून कामठी नगर परिषदेला अशिक्षित नगराध्यक्ष मिळालेले आहेत म्हणून बहुजन समाज पार्टी नगराध्यक्षा साठी शिक्षित उमेदवार पुढे करणार आहे कामठी नगर परिषदेच्या अध्यक्ष कोण होणार त्या नावाची घोषना जरी बहुजन समाज पार्टीने केली नाही.

Advertisement

तरी बसपा शिक्षीत उमेदवारालाच नगराध्यक्षा साठी पुढे करणार आहे. बसपाचे वरिष्ठ नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इंजि.विक्रांत मेश्राम, कामठी विधानसभा महिला विंगचे अध्यक्षा प्रतिभाताई नागदेवे कामठी विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी ,कामठी शहर अध्यक्ष विनय उके, कामठी शहर महिला विनच्या अध्यक्षा सुनीता रंगारी ,उपाध्यक्ष अमित भैसारे, महासचिव निशिकांत टेंभेकर, कामठी महिला विंगच्या शहर महासचिव दिपाली गजभिये, छावणी परिषदेचे अध्यक्ष नितीन सहारे, विशाल गजभिये व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी जनसंपर्क करत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement